करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणुक लढविणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यात निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भाजप सोडून बाकीच्या सर्व पक्षांशी युतीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन केले जाणार आहे, असे सांगण्यात आले.
करमाळ्यामध्ये येणाऱ्या निवडणुका लढवू आणि कोणताही पक्ष किंवा गट युती करण्यास एछुक असेल तर काही विचार विनिमय करून त्यांच्याशी युती करु ते पण भाजप सोडून अशी घोषणा करमाळ्याती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विशाल लोंढे, प्रविण मखरे, अतुल गायकवाड, नामदेव पालवे, जिल्हासंघटक देविदास भोसले, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, आदिवासी समाजातील पप्पू काळे, लखन पवार, आबासाहेब भिसे, नवनाथ भालेरा आदी उपस्थित होते.
