Ramadan Eid celebrated with enthusiasm in Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात व तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. आज (गुरुवारी) सकाळी साडेआठ वाजता ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण झाली. या ठिकाणी माण तालुक्याचे अभयसिंह जगताप यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. शहरात अभयसिंह जगताप व शितलदेवी मोहिते पाटील यांनी शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.

ईदगाह मैदान येथे मुजाहीद काझी, जामा मस्जिद, नुरानी मस्जिद, मरकस मस्जिद, आयेशा मस्जिद, माॅं आयेशा मस्जिद, दर्गाह मस्जिद, अराफत मस्जिदमध्ये नमाज पठण झाल्यावर सर्व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिवसभर सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी शिरखुर्माचा आस्वाद घेतला. आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल आदींनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *