करमाळा (सोलापूर) : कामोणे येथे क्रॉपसॅप अंतर्गत तूर शेतीशाळेचा 5 वा वर्ग घेण्यात आला. यावेळी तुर पिकावरील फुल व शेंगा अवस्थेतील कीड व रोगांचे नियंत्रण याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी फवारणी करताना घ्यावयाची काळजी व Pheromone Trap याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी ए. के. अडसूळ, उपकृषि अधिकारी एम. एम. रांजून, सहाय्यक कृषी अधिकारी डी. व्ही नवले, व्हि. के. सोरटे, बी. एस. कांबळे, केशव देमुंडे, उमाकांत जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
तुरीवरील फुल व शेंगा अवस्थेतील कीड रोगांचे नियंत्रण याविषयी कामोणेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
