Raje Ravrambha Shetkari Producer Company established a year ago is doing well KarmalaRaje Ravrambha Shetkari Producer Company established a year ago is doing well Karmala

करमाळा (सोलापूर) : एक वर्षांपूर्वी स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी अल्पावधीतच उत्तम पद्धतीने कामकाज करत आहे. त्यांच्या पाठीशी सह्याद्री ऍग्रो प्रोडूसर कंपनी ठामपणे आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाळुंज यांनी आश्वासती केले आहे.

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या ॲग्रो मॉलचे नुकतेच थाटात उद्घाटन झाले. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, रानडे ऍग्रोचे संचालक डॉ. संजय गुंड, विग्रो कंपनीचे सीनियर मॅनेजर अनंत कंगले, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कांतीलाल गीते, समिना पठाण, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाळुंज म्हणाले, शेतकऱ्यांसाठी खते, केळीची रोपे याबरोबरच सभासदांनी उत्पादित केलेला माल निर्यात करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य सह्याद्री कंपनीकडून केले जाईल. एप्रिल 2023 पासून राजे रावरंभा शेतकरी कंपनीने सह्याद्री कंपनीची डीलरशिप घेतली आहे. त्या माध्यमातून वॉटर सोल्युबल खते खरेदी करण्याचे काम ही कंपनी करत आहे. अल्पावधीतच त्यांनी खरेदी- विक्री जैन ठिबक पाईपची विक्री व केळी निर्यात करणे यामध्ये काम सुरू केले. भविष्यकाळात राजे रावरंभा शेतकरी कंपनीसाठी जी मदत लागेल ती मदत, मार्गदर्शन कंपनीकडून केले जाईल.

या कार्यक्रमासाठी आमदार संजयमामा शिंदे मोटर वाहतूक संस्थेचे सचिव सुजित बागल, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, शिक्षक नेते तात्यासाहेब जाधव, केळी निर्यातदार बालाजी पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चौगुले यांनी केले. तर आभार प्रा. बिभीषण मस्कर यांनी मानले.

राजे रावरंभा कंपनीचे कार्य कौतुकास्पद
राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने शेतकऱ्यांचे एकरी केळीचे उत्पादन 45 टनापेक्षा अधिक यावे. या दृष्टीने माती परीक्षण करण्यापासून ते खत व्यवस्थापन कसे असावे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे व्हावेत, केळी पीक परिसंवाद ,शेतकरी अभ्यास सहल, संचालकांचे प्रशिक्षण या माध्यमातून ते नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत. कंपनीचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून या कंपनीने केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारने सुद्धा घेतलेली आहे.या कंपनीचा भविष्यकाळ निश्चितच उज्वला असून भविष्यकाळात ही कंपनी शेतकऱ्यांसाठी जे उपक्रम राबविणार आहे त्यासाठी कृषी विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *