करमाळा (सोलापूर) : शाळेचा पाहिला दिवस आणि प्रेमराज याचा वाढदिवस हे समीकरण जुळल्याने प्रेमराज भुजबळ या विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जपत खाऊचे वाटप न करता रावगाव (धनगर वस्ती) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 26 विद्यार्थ्यांना लेखन साहित्य देण्यात आले. यामध्ये पट्टी, खोडरबर, पेन व पेन्सिलचे वाटप केले. मित्राने बर्थडेनिमित्त गिफ्ट दिल्याने सर्व विध्यार्थी आनंदी झाली. आणि प्रेमराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लेखन साहित्य वाटल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक बरडे व वर्गशिक्षिका रोहिणी चव्हाण यांनी त्याचे कौतुक केले. पालक म्हणून मनिषा भुजबळ यांचे आभार मानले.
वाढदिवसानिमित्त रावगावमधील प्रेमराज भुजबळकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
