करमाळा (सोलापूर) : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. जिल्हास्तरीय यादीत विद्यालयातील नऊ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आठवीमधील सार्थक सूर्यवंशी, आदित्य गायकवाड, शर्वरी सपकाळ, वैष्णवी वळेकर, नूतन हळणोर यांच्यासह पाचवीमधील स्वरा ओंबासे, सुप्रिया जगदाळे, अमरनाथ चिवटे व सानवी नेटके हे विद्यार्थी जिल्हास्तरीय यादीत आले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक भगत मॅडम, नायकुडे मॅडम, घोगरे सर, आव्हाड सर यांचे संस्थेचे संस्थापक नितीन भोगे, सचिवा भोगे मॅडम व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
