Karmala Politics : करमाळा नगरपालिकेत ३५० संभाव्य दुबार मतदार

करमाळा (अशोक मुरूमकर) : स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक राज्य निवडणूक आयोगाकडून घेतली जाते. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र मतदार यादीत दुबार नावे असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे हे दुबार मतदार शोधण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. अशा संभाव्य नावापुढे डबल स्टार लावला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी संबंधित व्यक्तीने प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. अशा संभाव्य दुबार मतदारांची करमाळा नगरपालकेनीही यादी प्रसिद्ध केली आहे.

करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. १० प्रभागात ही निवडणूक होणार असून यासाठी २१ हजार ५१६ मतदार आहेत. त्यामध्ये ३५० संभाव्य दुबार मतदार आहेत. त्यांची नावे नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

करमाळा शहराची २३ हजार १९९ लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीची ३ हजार ५३५ व अनुसूचित जमातीची ४३० लोकसंख्या आहे. २ डिसेंबरला या नगरपालिकेसाठी मतदान होणार असून प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. करमाळा शहरात २० पैकी अनुसूचित जातीचे ३, नागरिकाचा मागास प्रवर्गचे ५ व सर्वसाधारणचे १२ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यासाठी प्रभाग १ मध्ये २१८१, प्रभाग २ मध्ये २३५७, प्रभाग ३ मध्ये २३११, प्रभाग ४ मध्ये २२८४, प्रभाग ५ मध्ये २०११, प्रभाग ६ मध्ये २२८१, प्रभाग ७ मध्ये २४६९, प्रभाग ८ मध्ये १९१८, प्रभाग ९ मध्ये १५९८ व प्रभाग १० मध्ये २१०६ मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *