करमाळा (सोलापूर) : ‘ईडी’च्याविरुद्ध आवाज उठवत राज्यातील सामान्य नागरिकांना भेडसवणाऱ्या प्रश्नांबाबत आज (गुरुवारी) राष्ट्रवादी (शरद पवार गट) करमाळा तालुका व महाविकास आघाडी करमाळा तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेनाचे (ठाकरे गट) शहराध्यक्ष संजय शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जगताप, ऍड. प्रा. गोवर्धन चौरे, माजी सरपंच बिबीशन शिंगटे, माजी सरपंच राजेंद्र फलफले, माजी सरपंच बळी शिंदे, भरत महानवर, विनोद पडवळे, नितीन चोपडे, सचिन नलावडे, समाधान शिंगटे, रविराज घाडगे, शरद नेटके, मुस्तकीन पठाण, दीपक वारे, अशोक वारे आदी उपस्थित होते.
