करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा शहरात साधारण कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीची विकासकामेही पूर्ण झाली असून येणाऱ्या काळात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला तर शहराचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.
कानाड गल्ली, राशिन पेठ यासह निकम घर रस्ता, सिद्धार्थ व्यायाम शाळा आदी कामे केली आहेत. माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, युवा नेते शंभूराजे जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुकाप्रमुख अनिल पाटील, तालुका समन्वयक राहुल कानगुडे, शहर प्रमुख संजय शीलवंत, गटप्रमुख विश्वासराव काळे पाटील, भरत कांबळे, प्रवीण गायकवाड, रोहित कोरपे, नंदकुमार कोरपे, आकाश चिवटे, सोनू खुटाळे आदी उपस्थित होते.
करमाळा शहरातील भुयारी गटार योजना, नवीन अमृत टू पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण प्रकल्प, शहरातील सर्व रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये विविध समाजाचे सभागृह उभा करणे, शहरवासीयांना 24 तास पाणी व स्वच्छता या संदर्भात शिवसेनेचा वचननामा असून नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास मंगेश चिवटे यांनी व्यक्त केला.
