Video : समस्यामुक्त करमाळा करण्यासाठी भाजप पाठीशी राहणार : सुनीता देवी

करमाळा (अशोक मुरूमकर) : रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सुविधांसह करमाळ्याला धूळमुक्त शहर करण्यासाठी संधी द्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून संपूर्ण भाजप आपल्याला मदत करणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणाचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, असा विश्वास सुनीता देवी यांनी ‘काय सांगता’शी बोलताना व्यक्त केला आहे.

करमाळा नगरपालिका निवडणुकीत देवी या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. नागरिक संघटनेचे कै. गिरधरदास देवी यांच्या त्या सून व कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी आहेत. करमाळा शहराचा विकास करण्याचा मानस त्यांचा आहे. देवी म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गोरे यांच्यासह भाजपच्या रश्मी बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, दिग्विजय बागल, गणेश चिवटे आदींच्या माध्यमातून करमाळ्यासाठी विकास निधी उपलब्ध केला जाईल.’

पुढे बोलताना देवी म्हणाल्या, ‘करमाळा शहरात रस्ता, वीज, आरोग्य, स्वच्छता अशा मूलभूत सुविधा नाहीत. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नगरपालिकेची इमारत नाही, सर्वसामान्य नागरिकांसाठी टाऊन हॉल नाही अशा अनेक समस्या आहेत. त्या आम्हाला सोडवायच्या आहेत. भाजपच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. आम्ही नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून काम करणार आहोत.’

‘करमाळा शहराची नगरपालिका आपल्याला डिजिटल करायची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या नगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढवायचा आहे. मुलांना येथे चांगले शिक्षण देणे ही माझी जबाबदारी राहील. सर्व भागात नागरिकांना पूर्णदाबाने पाणी उपलब्ध करून दिले जाईल. करमाळा शहराच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप सरकार आणि करमाळ्यातील सर्व नेते माझ्या पाठीशी राहणार आहेत.’

भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविणार
करमाळा शहरातील भाजी विक्रेत्यांचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सर्व सुविधांयुक्त भाजी मंडई उभारून विक्रेत्यांच्या सोईनुसार त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लावले जाणार. त्यांना सरकारच्या योजना मिळवून दिल्या जातील.

काय केले जाणार?

  • करमाळा शहराला २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाणार
  • भुयारी गटार, अंडरग्राउंड विद्युत पुरवठा केला जाणार
  • सार्वजनिक स्वच्छतागृह, स्वच्छ परिसर, आरोग्याबाबत दक्ष राहणार
  • नगरपालिकेचा दवाखाना सुरू करून घेणार, गरजुंना चांगली आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य
  • करमाळा शहरातील दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक समाजाचे सर्व प्रश्न सोडवणार
  • अत्याधुनिक उद्यान उभारणार
  • तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा, स्विमिंग टॅंक उभारणार
  • सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार
  • शहरातील सर्व चौक व मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवले जाणार
  • आवश्यक तेथे सुलभ स्वछतागृह उभारले जातील
  • करमाळा शहराची हद्दवाद केली जाणार
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान उभारले जाणारमहिला व तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध केल्या जातील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *