पैजा लागल्या, गुलालाचीही खरेदी! विजयाची खात्री व्यक्त करत करमाळ्यात उमेदवारांचे दावे- प्रतिदावे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवणुकीची उद्या रविवारी (ता. २१) मतमोजणी आहे. या निकालाची उत्सुकता लागलेली असून सर्वच उमेदवार विजयीची खात्री व्यक्त करत आहेत. त्यावरून वेगवेगळे दावे- प्रतिदावेही सुरु आहेत. काही उमेदवारांसाठी समर्थकांनी पैजा लावल्याच्या चर्चा असून काही ठिकाणी तर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुलालाचीही खरेदी करून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

करमाळा नगरपालिकेसाठी एक नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकांसाठी २ डिसेंबरला १० प्रभागातून १६ हजार ९६ मतदान झाले होते. २१ तारखेला म्हणजे उद्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ही मतमोजणी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. शिवसेना (शिंदे गट), भाजप व करमाळा शहर विकास आघाडी (सावंत गट) यांच्यात प्रमुख लढत झाली. राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नगरसेवकपदासाठी उमेदवार रिंगणात होते. त्यांचा नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या सुनीता देवी यांना पाठींबा होता. राष्ट्रीय समाज पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी भावना गांधी यांना उमेदवारी दिली होती. तर नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून एक उमेदवार रिंगणात होता. भाजपच्या सुनीता देवी, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप या शिवसेनेच्या तर करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनी सावंत यांच्यापैकी नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवणुकीत शिसेनेचा नगराध्यक्षपदासह ११- १३ जागांवर विजय होण्याचा दावा आहे. भाजपचा नगराध्यक्षपदासह १०- १२ व करमाळा शहर विकास आघाडीचा (सावंत) यांचा नगराध्यक्षपदासह १४- १५ जागांचा दावा आहे. तर राष्ट्रवादीचा ३- ४ जागाचा दावा आहे. मात्र खरे चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्रभागनिहाय अशा झाल्या लढती

  • प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे जरीमुन्नीसा सय्यद व आशुतोष शेलार, भाजपचे सपना घोरपडे व शौकत नालबंद, करमाळा शहर विकास आघाडीचे जबीन मुलाणी व रवी जाधव तर राष्ट्रवादीच्या बानू जमादार यांच्यात लढत झाली. यांच्यात विजयी कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.
  • प्रभाग ३ मध्ये अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेरमी निर्मला गायकवाड, ताराबाई क्षीरसागर अभय महाजन, पूजा इंदलकर, अश्विनी चांदगुडे यांच्यात लढत झाली आहे. त्यांच्यात विजयी कोण होणार याकडे लक्ष आहे.
  • प्रभाग ५ मध्ये साजेदा कुरेशी, वैभवराजे जगताप, जबीनबानी कुरेशी, राहुल जगताप, अलमुन शेख, विक्रमसिंग परदेशी व तेजल मोरे यांच्यात लढत झाली. त्यांच्यात विजयी कोण होणार याकडे लक्ष आहे.
  • प्रभाग ७ मध्ये अश्विनी अब्दुले, युवराज चिवटे, सुषमा कांबळे, नितीन चोपडे, जनाबाई कांबळे, पुष्पा शिंदे, सविता कांबळे, गणेश माने यांच्यात लढत आहे. त्यांच्यात विजयी कोण होणार याकडे लक्ष आहे.
  • प्रभाग ९ मध्ये अश्विनी घोलप, रोहित बालदोटा, लता घोलप, सचिन घोलप, सुरेखा जगताप, गोपीनाथ विटकर, धनश्री दळवी यांच्यात लढत आहे. त्यांच्यात विजयी कोण होणार याकडे लक्ष आहे.

विजयाचे दावे
१० प्रभागात झालेल्या या निवडणुकीत सर्वच उमेदवारांचा विजयाचा दावा आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत राखुंडे यांनी संवाद साधून विजयाचा दावा केला आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये विक्रम परदेशी यांचा विजयाचा दावा असून याच प्रभागातील राष्ट्रवादीचे मोरे यांचाही विजयाचा दावा आहे. परदेशी म्हणाले, ‘सामाजिक कामात असलेला सहभाग आणि जनसंपर्क यामुळे विजयाची खात्री आहे. समर्थकांनी यातूनच गुलाल देखील खरेदी करून ठेवला आहे.’ राखुंडे म्हणाले, ‘प्रभागात विकास कामे करण्यासाठी वेळ दिलेला आहे. भविष्यात आणखी कामे करायची आहेत. यामुळे मतदार कौल देतील असा विश्वास आहे.’ याशिवाय कोणाचे काय दावे आहेत? काय चर्चा आहेत? कोणाचा काय अंदाज आहे? सविस्तर पहाण्यासाठी ‘काय सांगता’च्या युट्युबला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *