करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. अभिमन्यू माने यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. या नियुक्तीबाबत कनिष्ठ विभागाचे प्रशासकीय अधिकारी संभाजीराव किर्दाक यांनी त्यांचा सत्कार केला. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी व अध्यक्ष मिलिंद फंड उपस्थित होते.
संस्थेचे सचिव घुमरे म्हणाले, डॉ. माने हे महाविद्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम व योग्य व्यक्तिमत्त्व आहे. महाविद्यालय सेवेत रुजू झाल्यापासून त्यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे हित पाहिले आहे. महाविद्यालयाची प्रगती आणि लौकिक वाढविण्यासाठी माझ्याकडून त्यांना सहकार्य मिळेल. प्रभारी प्राचार्य डॉ. माने म्हणाले, ‘संस्थेने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन.’ प्रस्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. नितीन तळपाडे यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने प्रा. मुन्नेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले. तर आभार अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी मानले.
