BJP demands to rename Subhash Chowk in Karmala as Shri Ram Chowk

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील सुभाष चौकाचे नामांतर करून श्रीराम चौक असे करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. २२ जानेवरी प्रभु श्रीराम जन्मभुमी तिर्थक्षेत्र आयोध्या येथे होत असलेल्या रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळानिमीत्त करमाळा येथील सुभाष चौक येथे करमाळ्यातील हजारो रामभक्त, कारसेवक त्यांच्या भावना व अस्मितेचा प्रश्न म्हणून सुभाष चौक येथे जमणार आहेत. चौकात यज्ञ करून रामललाचे प्राणप्रतिष्ठापनाचे प्रत्यक्षदर्शी होणेकामी व स्वागताकामी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदर चौकाचा इतिहास पाहिला असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुभाष चौक नामकरण झालेबाबतचा अथवा तसे कारण असण्याचा कुठलाही कागदोपत्री अथवा प्रचलित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे रामललाचे प्रतिष्ठापनेचे मुहूतांवर सुभाष चौकाचे नामांतर होवून श्रीराम चौक असे नामकरण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, ॲड. प्रियाल अग्रवाल, पत्रकार विशाल घोलप, व्यापारी असोशियनचे स्नेहल कटारिया, कपिल मंडलिक यावेळी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *