करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील कै. मनीषा मुरूमकर यांच्या वारसाला महाराष्ट्र बँकेकडून आर्थिक मदत मिळाली आहे. नितीन मुरूमकर यांनी ही मदत स्विकारली. मे २०२५ मध्ये मनीषा मुरूमकर यांचा शेतात बोअरमधील मोटार काढताना दावे तुटल्याने डोक्याला लाकूड लागल्याने रुग्णालयात उपचार सुरु असताना अपघाती मृत्यू झाला होता. त्यांना पती, दोन मुले, एक मुलगी सासू असा परिवार आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सातच दिवसात सासरे लालासाहेब मुरूमकर यांचेही निधन झाले होते. पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या त्या चुलत भावजय होत्या. महाराष्ट्र बँकेत त्यांचे बचत खाते होते. त्यात त्यांचा विमा होता. बँकेचे अधिकारी श्री. करचे व श्री. कुलकर्णी यांनी मदत केली. महाराष्ट्र बँके येथे ही मदत देतेवेळी अश्विनी घोडके या देखील उपस्थित होत्या. यामध्ये त्यांनीही मोठी मदत केली होती.
बिटरगाव श्री येथील कै. मनीषा मुरूमकर यांच्या वारसाला महाराष्ट्र बँकेकडून मदत
