करमाळा (अशोक मुरूमकर) : केत्तूर येथील एकाने पोटच्या दोन चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण करमाळा तालुका हादरला आहे. केत्तूर येथील संबंधित व्यक्ती असून त्याची शेती हिंगणी हद्दीत आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे.
किरकोळ घडलेल्या घटनेतून राग आल्याने बापाने दोन चिमुकल्या मुलांना शेतात नेले आणि तेथेच त्यांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर काही वेळाने त्यानेच स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वजण विहिरीकडे धावत गेले मात्र तोपर्यंत चिमुकल्यांचा जीव गेला होता, अशी प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलं जुळी होती. वडिलांचे नाव सुहास जाधव (वय ३२) असल्याचे समजत आहे. तर मृत्यू झालेल्या मुलाचे नाव शिवांश सुहास जाधव व मुलीचे नाव श्रेवा सुहास जाधव (वय 8) असल्याची माहिती आहे. दोघेही जुळे बहिण भावांड होती.
