One was beaten up with an iron pipe by two people in Devalali saying why did you call my brother

करमाळा (सोलापूर) : ‘तू माझ्या भावाला फोन का लावला’, असे म्हणत दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण केली असल्याचा प्रकार तालुक्यातील देवळाली येथे घडला आहे. याबाबत दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल भास्कर गायकवाड व प्रशांत उर्फ फंटू अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये महेश तानाजी गोसावी (वय २१, रा. देवळाली) यांनी फिर्याद दिली आहे. देवळाली स्टँडवर बुधवारी ६ तारखेला रात्री ९ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीनी फिर्यादीला शिवीगाळ सुरु केली. माझ्या भावाला फोन का लावला असे म्हणून त्यांनी मारहाण सुरु केली. तुमचा काही तरी गैरसमज आहे, असे म्हटल्यानंतरही त्यांनी मारहाण केली. याप्रकणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *