शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज मिळावी यासाठी दक्षता घ्या : आमदार पाटील

करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज मिळावी यासाठी महावितरणने दक्षता घ्यावी’, अशी सूचना आमदार नारायण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जेऊर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक आमदार पाटील यांनी घेतली. यावेळी उपविभागीय कार्यकारी उपअभियंता विरेंद्र‌ कलावते, जेऊर विभागचे उपअभियंता प्रभास भोयर, कुर्डुवाडी विभागचे उपअभियंता पोपट चव्हाण यांचेसह शाखा अभियंता उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

आमदार पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे वर्षाचे आर्थिक गणित रानात उभे असलेल्या पिकांवर असते. या एका पिकावर शेतकऱ्यांना प्रपंचात येणारे सर्व प्रश्न सोडवावे लागतात. यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सणस्या जाणुन प्रश्न सोडवावेत. आपल्याही कुटुंबातील कोणीतरी शेतकरी असेलच यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन काम करावे. ऊन्हाळा तोंडावर असताना वीजेची मागणी वाढणार असे लक्षात घेऊन योग्य ती काळजी करुन वीज पुरवठा नियोजन करण्यात यावे. यापुढे आपण जिल्हा परिषद गटानुसार महावितरण आढावा बैठक घेणार असुन शाखा अभियंता वा कर्मचारी यांनी कामात हलगर्जीपणा करु नये असे आदेश आमदार नारायण आबा पाटील यांनी दिले. या बैठकीस आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी जेष्ठ संचालक धुळाभाऊ कोकरे, संचालक विजय नवले, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गोडसे, पंचायत समिती सदस्य धनंजय शिरस्कर,
पंचायत समिती माजी सभापती व नुतन सदस्य अतुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे,संचालक डॉ हरिदास केवरे,प्रा. संजय चौधरी सर,संचालक रविकिरण फुके, संचालक रामेश्वर तळेकर, संचालक दत्ता गव्हाणे,संचालक नवले, संचालक श्रीमंत चौधरी, माजी संचालक रविभाऊ कोकरे,किसन शिंदे,विठ्ठल शिंदे,दादा भांडवलकर,राजू भोसले, बंडू शिंदे,अनिल कोकाटे,सागर पोरे,शाहजी पाटील,निवास उगले,राजेंद्र ठोंबरे,दादा भांडवलकर,मावली भागडे,संजय तनपुरे,तात्या साहेब गोडगे,राजाभाऊ झोळ,शरद भोसले,गणेश जगताप, शमरावं झिणजाडे,दत्तू पाटील,अमर जगताप,अजित वगरे,अभिजित जगताप, भारत मोगल, सिद्धार्थ जिंगळे,पंडित रणदिवे, रामभाऊ नलावडे,किरण पाटील,रावसाहेब नेमाने, दत्तू शिंदे,संजय तोरमल, गणेश सव्वासे, संतोष कोपनर, संतोष पाटील, बाबासो कोपनर, विनोद शिंदे, हबीब मुलानी,मौलाना शेख,नाना पवार, चंदू पालवे, अण्णा आडेकर, धनु ननवरे,दत्तात्रय आर्किले, मनोहर गोडगे, भैय्या शिंदे, शिवाजी नरुटे, गणेश फुके, बिभीषण हुलगे, कैलास कोकरे, नाथा रणदिवे,शेजाळ उपसरपंच,जायद्रत शिंदे,शेळके सर, अंकुश शिंदे साडे, सुखदेव ढाळे,धनंजय जाधव,किसन घोडके,तात्या काळे,आदि उपस्थित होते. प्रास्तविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दराडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *