करमाळा (सोलापूर) : जेऊर बायपास येथे पंढरपुरवरून आलेल्या एसटीतून उतरून रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या एका मोटरसायकलने एका ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन जखमी केले आहे. यामध्ये एका अनोळखी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दशरथ भिवा मस्कर (वय ७२, रा. वरकाटणे) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात २७ तारखेला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला आहे. मस्कर हे पंढरपुरवरून नाशिक एसटी बसने आले होते. घराकडे जाण्यासाठी ते जेऊर बायपास येथे उतरले. तेथून रस्ता ओलांडत असताना त्यांना मोटारसायकलने धडक दिली. त्यात त्यांच्या पायाला मार लागला आहे.
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४