केत्तूर मंडळातून श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची सुरुवात

करमाळा (सोलापूर) : केत्तूर २ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने आज (शनिवार) श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य परिवहन, महावितरण, आरटीओ, मुद्रांक नोंदणी अशा विविध विभागानी सहभाग नोंदवला. आपापल्या विभागाकडे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला. एका छताखाली सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा म्हणून केत्तूर मंडळात हे अभियान घेण्यात आले. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पंचायत समितीचे सदस्य ऍड. अजित विघ्ने यांच्यासह या भागातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *