करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सचिन सरडे यांच्यावर नवनाथ गुंड यांनी आर्थिक गैरव्यहवार केल्याचा आरोप केला आहे. गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्याकडे याबाबत त्यांनी लेखी तक्रार केली असून ग्रामसेवक सरडे यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सरडे हे आठ वर्षांपासून शेटफळमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यकर्त आहेत. त्यांनी विकास कामाच्या नावाखाली गैरव्यहावर केला आहे. त्यांनी केलेल्या कामांची त्वरित चौकशी करावी, अन्यथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी म्हणजे १४ एप्रिलला आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेटफळच्या ग्रामसेवकांविरुद्ध तक्रार; चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा
