A case has been registered against a person selling illegal liquor at Vadapav Center in ManjargaonA case has been registered against a person selling illegal liquor at Vadapav Center in Manjargaon

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांजरगाव येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय ३७) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयित आरोपीकडून ५ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून ही कारवाई झाली आहे. पोलिस कॉन्स्टेबल मनजीत भोसले यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.

पेट्रोलिंग सुरु असताना पारेवाडी ते कुंभेज फाटा रोडवर मांजरगाव येथे एकजण बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा गुन्हा दाखल झालेला संशयित बेकायदा दारू विक्री करत असताना दिसला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पृथ्वीराज वडापाव सेंटरच्या मागे हा संशयित दारू विक्री करत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *