करमाळा (सोलापूर) : केळी निर्यात व्यवहारात झालेल्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत संबंधित व्यक्तीला रक्कम मिळवून देण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात IPS अंजना कृष्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
माजी नगरसेवक राहुल जगताप यांची केळी निर्यात व्यवहारात फसवणूक झाली होती. या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर IPS अंजना कृष्णा यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक रणजीत माने, तपास अधिकारी पाखरे तसेच बंडगर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान देत तपास प्रभावीपणे केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे फसवणूक झालेली रक्कम मिळाली.
या प्रकरणात न्याय मिळाल्याबद्दल माजी नगरसेवक जगताप व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपभापती चिंतामणी जगताप यांनी IPS अंजना कृष्णा यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
