Free Ambulance on behalf of Shiv Sena on the birth anniversary of Hindu heart emperor Balasaheb Thackeray

करमाळा (सोलापूर) : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्त शिवसेनेच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली ही सेवा सुरु करण्यात आली आहे, याचा लाभ घ्यावा घेण्याचे आवाहन शिवसेना विधानसभाध्यक्ष राहुल कानगुडे यांनी केले.

या लोकार्पण सोहळाप्रसंगी राहुल कानगुडे, आप्पासाहेब गणेशकर, लखन शिंदे, सतिश कानगुडे, गोरख पवार, बापू कानगुडे, बाळू शिंदे, नितीन कानगुडे, सोमा साळवे, सचिन कानगुडे, स्वप्निल कानगुडे, कैलास बीचित्कार, अण्णासाहेब शिंगाडे, नितीन दामोदर, नाना कानगुडे, विकास रांखुडे, प्रफुल्ल दामोदरे, अमोल रांखुडे, श्रीकांत गोसावी, चांदणे, लखन आवटे ,राज शेख, दादा फुके, सुनील कानगुडे, रवींद्र कानगुडे करमाळा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते देवळाली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्याबाबत तात्काळ सेवेसाठी सचिन कानगुडे : 9767407937, नागेश चेंडगे : 9309703938 व विशाल कानगुडे : 9112467807 यांच्याशी संपर्क साधावा.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *