करमाळ्यातील कानाड गल्लीत आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील आर्थिकदृष्ट्या गोरगरीब व तळागाळातील जनतेला तात्काळ व मोफत आरोग्य उपचार सुविधा देण्याबाबत करमाळा नगरपालिका व आरोग्य विभाग निश्चितपणे अधिक वेगवान व तत्पर राहील, याची ग्वाही नगरसेवक सचिन घोलप यांनी कानड गल्ली येथे आरोग्य केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने दिली.

करमाळा येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन माजी नगरसेवक रामचंद्र घोलप यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा नगराध्यक्षा मोहिनी सावंत उपस्थित होत्या. हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून नागरी आरोग्य सुविधा वर्धनी केंद्राचे उद्घाटन कानड गल्ली येथे झाले.

नगरसेवक सचिन घोलप यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राला मंजुरी मिळाली. ते म्हणाले, हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेखाली करमाळा शहरातील हा तिसरा दवाखाना असून या अभिनव अशा आरोग्य योजनेतून गोरगरीब व तळागाळातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना मोफत व तात्काळ आरोग्य सुविधा मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांनी यासाठी मोठे सहकार्य केले. उपनगराध्यक्ष अतुल फंड, विरोधी पक्ष नेते प्रशांत ढाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, तालुका आरोग्य अधिकारी महेश्वर काटकर, नगरसेवक संजय सावंत, पाणीपुरवठा समितीचे नगरसेवक विक्रमसिंह परदेशी, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पूजाताई इंदलकर, बांधकाम समितीच्या सभापती नगरसेविका लताताई घोलप, दिवाबत्ती व ग्रंथालय समितीच्या सभापती निर्मला गायकवाड, नगरसेविका स्वातीताई फंड, नगरसेविका चैत्राली सावंत, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेविका सुनीताताई ढाणे, ज्योत्स्नाताई लुनिया नगरसेवक, संदीप कांबळे, नगरसेविका जबीन मुलानी, नगरसेवक रवी जाधव, सुवर्णा आलाट, युवराज चिवटे, नगरसेविका अश्विनी अब्दुले, नगरसेविका साजदा कुरेशी, सामाजीक कार्यकर्ते विजय लावंड, सोमा माने, बाबासाहेब माने, भाऊ राखुंडे, डॉ. पद्माळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे शिवाजी खंडागळे यांनी तर आभार बांधकाम समितीच्या सभापती लताताई घोलप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *