रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला आहे. यामध्ये सहाजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यामध्ये डिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेत एनडीआरएफ, टीडीआरएफच्या जवानांकडून मदत कार्य सुरु आहे. काल रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
इर्शाळवाडी गावात २०० ते २५० लोक आहेत. पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील नागरिकांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन हे घटनास्थळी आहेत. एनडीआरफचे पथक येथे मदत कार्य करत आहे. मात्र पावसामुळे मदत कार्य करण्यास अडचण येत आहे. मदत कार्य करण्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या एका जवानाला हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
इर्शाळवाडी येथे मदत कार्य करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. खोरे आणि टिकावाच्या साह्याने येथे मदत सुरु आहे. पोकलेन व जेसीबी येथे मदतीसाठी घटनास्थळी जाऊ शकत नाही. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे. पावसामुळे येथे अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे तेथील आडवा घेत आहेत. मुरबे धरणाच्या जवळ हे गाव आहे. डोंगर कडा कोसळून ही दुर्दैवी घटना घडली आहे.