करमाळा (सोलापूर) : कर्नाटकात झालेल्या जैन साधू हत्याप्रकरणाचा निषेध करण्यासाठी करमाळा शहरात सकल जैन समाज बांधवाच्या वतीने आज (गुरुवारी) दंडाला काळे रेबीन बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारोच्या संख्येने बांधव सहभागी झाले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. महसूलचे नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. यावेळी समीर पटेल उपस्थित होते.

जैन मंदिर येथून हा मोर्चा निघाला. करमाळा तहसील कार्यालय येथे मोर्चा येताच डॉ. सुनिता दोशी यांनी घटनेचा निषेध करत मनोगत व्यक्त केले. या मोर्चाला आरपीआयचे लक्ष्मण भोसले यांनी पाठिंबा दिला. पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एन. जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांनी बंदोबस्त ठेवला.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *