करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पावसाळी शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धा 2023- 24 चे आयोजन महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये करमाळा तालुक्यातील विविध शाळा सहभागी झालेल्या होता. या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेमध्ये 17 वर्ष वयोगटांमध्ये योगासन रिदमिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनिकेत उमेश करे (11 वी विज्ञान) यांचा आला आहे.
19 वर्ष मुले योगासन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मच्छिंद्रनाथा लोंढे (11 वी विज्ञान), द्वितीय क्रमांक समाधान विठ्ठल क्षीरसागर (12 वी विज्ञान), तृतीय क्रमांक किशोर किसन सालगुडे (12 वी विज्ञान), 19 वर्षीय मुली रिदमिक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक ऐश्वर्या संतोष आरणे (12 वी कला) तर 19 वर्षीय मुलांमध्ये रिदमिक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक गोरक्ष नाथा लोंढे (12 वी विज्ञान) तर 19 वर्षीय मुले आर्टिस्टिक योगासन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक किशोर किसन सालगुडे (12 वी विज्ञान). यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रिंडाशिक्षक उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व प्रा. राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन यशवंत परिवाराचे विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.