करमाळा (सोलापूर) : सावडी येथील दिगंबररावजी बागल माध्यमिक विद्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी यशवंत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी १६ व्या शतकात बहुजनांच्या सहकार्याने समताधिष्ठित धर्मनिरपेक्ष स्वराज्य निर्माण करून सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. त्यामुळेच स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावण्यासाठी लोक पुढे येत होते. ही गोष्ट आजच्या तरुणांना आदर्श, प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देशमुख होते. उपसरपंच महेंद्र एकाड, संस्थेचे सचिव दतात्रय जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन नितीन कांबळे यांनी तर आभार कनेरकर यांनी मानले.