करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील बेकायदा दारू विक्री बंद करावी अशी तक्रार आल्यानंतर करमाळा पोलिस ठाण्याने हा विषय अतिशय गंभीररीत्या घेतला आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास येथील कायमची दारू बंदी होऊ शकले. मात्र नागरिकांनी मात्र पोलिस यंत्रणेलाच दोष देऊन चालणार नाही. ही दारू विक्री करण्यास पोलिस कायदेशीर रित्या कारवाई करतील यात शंका नाही. परंतु नागरिकांनी केलेल्या तक्रारींपासून ही दारू विक्री बंद करण्यासाठी करमाळा पोलिस लक्ष ठेऊन आहेत. त्यातूनच एका दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आता यापुढेही नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
पोथरे येथे दारू पिऊन एकाने आत्महत्या केली. त्यानंतर पुन्हा अशा घटना घडू नयेत म्ह्णून गावातील काही नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. दरम्यान पोलिस पाटील संदीप पाटील यांनीही दारू विक्रेत्यांची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी धडक मोहिमी सुरु केली होती. त्यानंतर अनेकदा पोलिस येथे येऊन गेले मात्र दारू विक्रेते सापडले नव्हते. आता मात्र एकजण सापडला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस नाईक बालाजी घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक गोरख गायकवाड (वय ४३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ९१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली असून याचा पुढील तपास केला आहे.