करमाळा (सोलापूर) : वंजारवाडी येथे एकाची हत्या झाली आहे. वामन विठ्ठल दराडे (वय ६०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यात जबर मारहाण करून ही हत्या झाली आहे. आज (सोमवारी) सकाळी ही घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती समजताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी भेट दिली आहे. संबंधित व्यक्तीचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वंजारवाडी येथील शेतात काम करण्याच्या निमित्ताने दोघेजणे शेतात गेले होते. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी दराडे यांना मृत घोषित केले आहे. सदरची घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली व कोणी केली याबाबत तपास सुरू आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/08/Pol-Add-707x1024.jpg)