करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड रस्त्यावर कामोणे फाट्यावर एक कोल्हा ठार झाला आहे. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी निदर्शनास झाला आहे. भरधाव वेगात आलेल्या अनोळखी वाहनाने त्याला धडक दिली असल्याची शक्यता. त्या धडकेत तो कोल्हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला आहे. करमाळा- जामखेड रस्त्यावर वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाल्याची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे.
करमाळा- जामखेड रस्त्यावर पोथरे येथे कान्होळा नदीच्या पुलाजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी एक कोल्हा भरधाव वेगात आलेल्या वाहनाच्या धडकेत ठार झाला होता. त्यानंतर आता याच रस्त्यावर कामोणे फाटा येथे एक कोल्हा ठार झाला आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी ठार झाल्यास गुन्हा दाखल होतो. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने वन्यप्राणी प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत वनरक्षक एस. आर. कुर्ले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.