बार्शी (सोलापूर) : येथील माजी नगरसेवक नाना वाणी यांचे बंधू विशाल वाणी यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. आयपीसी कलम 307, 324, 326, 504, 506, 34 आर्म Act 4, 25 महाराष्ट्र पोलिस Act135 अशा कलमानुसार त्यांच्यासह सात संशयितांविरुद्ध बार्शी पोलिस ठाण्यात एप्रिलमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक झाली होती. उर्वरित संशित आरोपी हे फरार होते. त्यांनी बार्शी सत्र न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर फरारी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालय येथे अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता. संशयित आरोपींवर कोयतेने, तलवारीने तसेच लाटी- काटीने हाणमार केल्याबद्दल व जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दलचा आरोप होता. आरपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद सादर करून आरोपीस interim जामीन मंजूर केला आहे. यामध्ये संशयित आरोपीतर्फे ऍड. भाग्यश्री अमर शिंगाडे- मांगले व अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.