करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील नागोबा मंदीराजवळ गोवंशाची (जर्सी) वासरे घेऊन जाणारा एक पीकअप पकडण्यात आला आहे. आज (सोमवारी) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान हा पीकअप पकडण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे, चंद्रकांत ढवळे, प्रदीप जगताप आदी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित पीकअप कर्जतकडून परांडाकडे जात होता. तेव्हा नागोबा मंदीराजवळ हा पीकअप पकडण्यात आला. त्यानंतर यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.
करमाळ्यात गोवंशाची वासरे घेऊन जाणारा पीकअप पकडला
