करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी पाणीपुरवठ्यासाठी टँकर दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आज (सोमवारी) सत्कार करण्यात आला आहे. पाऊस लांबल्याने रावगाव येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यावर मार्ग म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाणीपुरवठ्यासाठी टँकर दिला आहे.
