करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार नारायण पाटील गटाच्या सारिका आदलिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. अश्विनी सवासे यांनी राजीनामा दिल्यानंतर येथील सरपंचपद रिक्त झाले होते. पाटील गटाचे मार्गदर्शक अर्जुनराव सरक व सुनील तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदलिंग यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी अनिल ठाकर, तलाठी ढोणे, तलाठी कन्हेरे, ग्रामसेवक ए. एम. माने, पोलिस कर्मचारी पवार, पाटील यांनी काम पाहिले. यावेळी माजी सरपंच छायाकाकू राऊत, अश्विनी सवासे, उपसरपच गोविंद लोंढे, माजी उपसरपंच शाहजी राऊत, ग्रामपंचायत सदस्या दाळूबाई बादल, सदस्य श्रीहरी आरणे, दादासाहेब लोंढे, उपसरपंच हनुमंत बादल, नाना आदलिंग उपस्थित होते.
कोंढेज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या सारिका आदलिंग
