By worshiping 90 cows, Bull Pola is celebrated in Karmala

करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान संचलित गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्था येथे 90 गाईंची पूजा करून बैल पोळा सण साजरा करण्यात आला. गोपालन संस्थाचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी गोशाळेच्या स्थापनेपासूनची वाटचाल सांगितली. यावेळी ह.प.भ. अमोल महाराज काळदाते यांनी जीवनात गाईंचे महत्व या विषयी माहिती देऊन खाटेर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कार्याबद्दल धन्यवाद देऊन आभार मानले.

संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल परेश दोशी व मनोज पितळे यांचा गो- मातेच्या सहवासात सत्कार करण्यात आला. याबरोबर धीरज सोळंकी यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित संपतनिकांच्या हस्ते गो- मातेची पूजा करण्यात आली. सर्व गाईना उपस्थितानी पोळ्याचा व गुळाचा नैवेद्य खाऊ घालून पोळा सण उत्साहात साजरा केला.

गाईना सजवण्यासाठी व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, पोपट राव काळदाते, प्रीतम राठोड, शशी अप्पा ननवरे, गिरीश शहा, काळदाते परिवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका संगीता खाटेर, सौं विजया मुनोत, सौं शामला कोठारी,सौं वैशाली गुगळे,मोक्षा खाटेर, विजया कोठारी, सौं काळदाते, यांचे सह गो- सेवा समितीचे प्रकाशजी मुनोत,जगदीश शिगची,कचरू लाल मंडलेचा, रसिक मुथा,संजय शा. कोठारी,जीवन भाई संचेती,नितीन दोशी, वैभव दोशी, दिनेश मुथा, गणेश बोरा, केतन संचेती आदी सदस्य यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दोशी, अनुप दोशी, पिंटूशेठ गुगळे,प्रीतम लुंकड, धीरज सोळंकी, सुशील कात्रेला, संदीप पवार, बंडू दोशी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. संकेत खाटेर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी आभार मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *