करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून सुरळीत पाणी मिळावे, अशी मागणी नागिकांनी केली आहे. याबाबत करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर २४ नागरिकांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, किल्ला विभागात दोन महिन्यापासून सुरळीत पाणी मिळत नाही. बुरुज लाईन परिसर येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधूनही प्रश्न मार्गी लागत नाही. पंपींगसाठी वीज मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पाणी पुरवठावेळी वीज गेल्यानंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. यामुळे संपूर्ण परिसर त्रस्त झाला आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर शेखर जोगळेकर, प्रा. मंगेश तरकसे, अनिल कलढोणे, दादा गाडे, रेश्मा गाडे, कांतीलाल टके, जी. जे. सावंत, ज्ञानेश्वर पटुळे, सुषमा शिंदे, दर्शन चंकेश्वर, नारायण जोशी, अविनाश जोशी, सागर गायकवाड, सूरज मिसाळ, प्रमोद जाधव, नानासाहेब शिंदे, आशिष अडसूळ, समीर खान, शिवाजी जगताप, प्रशांत जगताप, अक्षय घुमरे, जयंत दळवी, लालसाहेब कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.