करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे केले पाहिजे, असे मत डॉ. सुभाष सुराणा यांनी व्यक्त केले आहे. जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी विचारविनिमय करण्यासाठी पाटील गटाकडून बैठक घेण्यात आली. स्व. मोतिकाका गादिया सभागृहात ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व्यापारी पोपट मंडलेचा होते. यावेळी समाजसेवक तथा आनंद पतसंस्था संस्थापक चेअरमन डॉ. सुभाष सुराणा, माजी सभापती अतुल पाटील, रामलाल कोठारी, हंबीराव चव्हाण, परेशकुमार दोशी, राजू राठोड, किशोर राठोड, सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ जगताप, हनुमंत विटकर, महेश कांडेकर, रमेश भोसले, नवीन दोशी, बबनराव कोठावळे, प्रकाश निमगीरे, सचिन निमगीरे, विवेक दोशी आदी उपस्थित होते.
जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारण न करता केवळ नागरिकांना सर्व नागरी सुविधा देण्यावर भर दिल्याने आतापर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. या निवडणुकीतही विजयी परंपरा कायम राहील, असा विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे. जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या शहराचा विकास एवढे एकच उदिष्ट आजवर आपण नजरेसमोर ठवल्याने ३० वर्ष जेऊरकरानी या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्याची संधी दिली. नागरिकांच्या विश्वासामुळे सरपंच ते आमदार हा प्रवास करू शकलो, असे ते म्हणाले. या निवडणुकीत आपला विचारांचा पॅनल विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटील गटाचे समर्थक सुनील तळेकर यांनी थेट आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर निशाणा साधला. केवळ विरोधासाठी विरोध करत भविष्यातील निवडणुकीसाठी आपले पोलिंग एजंट तयार व्हावेत या एकाच उद्देशाने त्यांनी विरोधी पॅनल तयार करण्याचे काम सुरु केले आहे. त्यांच्याकडे जेऊरच्या विकासासाठी कसलाही अजेंडा नसल्याचे सांगितले. तसेच जे करमाळा मतदासंघांचा चार वर्ष झाली विकास करू शकले नाहीत ते जेऊर शहराचा विकास काय साधणार असा टोलाही तळेकर यांनी लगावला.
सूत्रसंचलन विनोद गरड यांनी केले तर आभार सदस्य सुहास कांडेकर यांनी मानले. या बैठकीस युवानेते पृथ्वीराज पाटील, मनसे नेते आनंद मोरे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक, भारत साळवे, माजी सरपंच भास्कर कांडेकर, राजूशेठ गादिया, धनु शिरस्कर, दत्ता तळेकर, जालिंदर साळी शांताराम सुतार, बापू घाडगे, संदीप कोठारी, शेरखान नदाफ, योगेश करनवर, मुबारक शेख, संतोष वाघमोडे आदी उपस्थित होते.