19 months bail to the suspected accused in the rape case by the High Court19 months bail to the suspected accused in the rape case by the High Court

करमाळा (सोलापूर) : सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम, व्हाट्सअप व फेसबुकवरून ओळख करून मैत्री करत बलात्कार केल्याप्रकरणात संशयित आरोपीवर बलात्कार व ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात 604 दिवसानंतर (19 महिने 15 दिवस) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. भाग्यश्री मांगले शिंगाडे व ऍड. अमर शिंगाडे यांनी काम पाहिले. संशयित आरोपीची इंस्टाग्राम, फेसबुक व व्हाट्सअपवर उस्मानाबाद जिल्ह्यातील मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर गुन्हा घडण्यामध्ये झाले.

संशयित आरोपी संबंधित मुलीला भेटण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून करमाळा तालुक्यात भेटण्यासाठी आला. भेटल्यानंतर संशयित आरोपींने अल्पवयीन मुलीवर दोन मित्राच्या सहाय्याने तिच्यावर एका लॉज येथे अतिप्रसंग केला. यामध्ये संशित आरोपीवर करमाळा पोलिस ठाण्यात 10 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. संशयित आरोपीचा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथील जामीन फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय येथे जामीनसाठी धाव घेतली होती. संशयित आरोपीच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय समोर युक्तिवाद केला. संशयित आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आरोपीस शेर्ती व अटी तसेच 30 हजाराच्या जामीनावरती जामीन मंजूर केला, असे ऍड. मांगले शिंगाडे व ऍड. शिंगाडे यांनी काम पाहिले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *