करमाळा (सोलापूर) : येथील एसटी आगारात मद्यप्राशन करून शांतता भंग केल्याप्रकरणी एका वाहकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संजय कदम (वय 56, व्यवसाय नोकरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
करमाळा एसटी आगार येथे सात तारखेला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मद्यप्राशन करून संशयित वाहक हा वेडेवाकडे चालत कामावर आला होता. तो काय बोलतो आहे हे त्याचे त्याला देखील समजत नव्हते. तो बोलताना दारूचा वास येत होता. त्याचे डोळे विसपरलेले होते. तो सतत बडबड करत होता, तो तसाच परत एसटी आगार परिसरात वेडेवाकडे चालत गेला व मोठमोठ्याने बोलत आगारात येणारे- जाणारे लोकांना बोलून गोंधळ करू लागला. त्याने एसटी आगार परिसरात गोंधळ घालून सार्वजनिक क्षमतेचा भंग करून गोंधळ केला असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्याला आगारप्रमुख होनराव यांच्या समोर उभा केले तेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू प्राशन केल्याचे समोर आले. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. यांचा पुढील तपास सुरु आहे.