सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळच्या वतीने विविध योजनेतर्गंत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी. तसेच उत्पादीत मालाचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून 7 ते 9 नोव्हेंबरदरम्यान तीन दिवस जिल्हास्तरावर दिवाळी मेळाव्याचे पोलिस कल्याण केंद्र मुरारजी पेठ सोलापूर येथे आयोजन करण्यात आल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी सांगितले आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळात विविध योजनेतर्गंत स्थापन जिल्ह्यात 10 हजार 930 स्वयंसहायता महिला बचत गट व 1 लाख 15 हजार 641 सभासद आहेत. बचत गटाच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात लोकसंचलित साधन केंद्र व शहरी भागात शहरस्तरीय संघ हि संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारे सदयस्थितीमध्ये जिल्ह्यात एकूण 22 ग्रामीण व 10 शहरी केंद्र उभारण्यात आले आहेत. या सर्व केंद्रे शाश्वत होण्याच्या दृष्टीने केंद्राची कार्यकारिणी समिती सदस्य केंद्र यांच्या माध्यमातून चालवले जात आहेत.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व गरजूवंत कुटुंबाचा सामाजिक आर्थिक विकास साधने असा असून, महिलांचे स्वयं सहाय्यता बचत स्थापन करुन विविध वित्त पुरवठा बँकाकडून वित्त पुरवठा केला जातो. एकूण 7 हजार 292 गटांना 236.00 कोटी रु कर्ज वितरण केले आहे. त्यामधून महिलानी शेती बिगर शेती व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे.
ग्रामीण भागातील ताजे व स्वच्छ दिपावलीचे पदार्थ पणत्या आकाश कंदील विणकाम लाकडी कोरीव काम केलेल्या विविध वस्तु कापडी शिवणकाम केलेल्या वस्तु सुगंधी अत्तर व अगरबती यासह अनेक वस्तु प्रदर्शनात योग्य भावात मिळतील प्रदर्शन दर दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 9 पर्यंत असेल ग्रामीण महिलाच्या छोट्या मोठ्या व्यावसायाकडील वाटचालीस प्रोत्साहन देण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकानी भेट देवून खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. लामगुंडे यांनी केले आहे.