करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री, कोंढारचिंचोली, बोरगाव, उमरड आदी ठिकाणचे 3054- 2419 हेड अंतर्गतचे रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत कामे मंजूर झाली आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातील रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाख निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मजबुतीकरण करणे तसेच पूल बांधणे या कामासाठी गट ब व गट क मधून 12 कामांना निधी मंजूर झाला आहे. यामध्ये बोरगाव- दिलमेश्वर जिल्हा हद्द रस्ता ग्रामा 66, पोपळज ते सोगाव पूर्व रस्ता ग्रामा 79, गुळसडी ते शेलगाव क रस्ता ग्रामा 41, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता ग्रामा 12, झरे (पोफळज) ते हजारवाडी रस्ता ग्रामा 259, बिटरगाव श्री ते भोसले वस्ती ग्रामा 163, निमगाव टे ते सापटणे ग्रामा 139, उमरड ते झरे रस्ता ग्रामा 208, सौंदे ते सरपडोह रस्ता ग्रामा 40, बिटरगाव ते शिंगेवाडी रस्ता ग्रामा 22, कोंढारचिंचोली ते गाडे वस्ती ग्रामा 275 या रस्त्यांसाठी 2 कोटी 50 लाख निधी मंजूर झाला आहे. यामुळे निधीमधून रस्ते व पूल यांच्या मजबुतीकरणाची कामे होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा गावागावांना जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
बिटरगाव श्री ते तरटगाव बंधाऱ्याकडे जाणारा रस्ता चिखलमय
2023- 24 या आर्थिक वर्षांसाठी लेखाशीर्ष 3054- 2419 रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत गट ब व गट मधील कामांना सरकार निर्णयांतर्गत प्रशासकीय मंजूरी मिळाली असून सोलापूर जिल्ह्यासाठी 22 कोटी रुपये निधी मंजूर असून त्यापैकी करमाळा तालुक्यासाठी 2 कोटी 50 लाख निधी मंजूर असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
बिटरगाव श्री येथील रस्ता होणे हे आवश्यक होते. या रस्त्याचे काम करण्यात यावे म्हणून आमदार शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. बिटरगाव श्री येथून भोसले व दळवी यांच्या बांधावरून कॅनलवरून हा रस्ता सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याकडे जातो. या रस्त्याने बोराडे, मुरूमकर, नलवडे, पाटील, शिर्के, चुंबळकर, पाटील आदींच्या वस्ती आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. येथून अनेकजण रस्त्याने ये- जा करतात. या रस्त्यावर पावसात चिखल होतो. उन्हाळ्यात शेतकऱ्यांचा ऊस काढण्यासाठीही येथे मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे हा रस्ता होणे आवश्यक होते.