करमाळा (सोलापूर) : येथील क्षितिज महिला ग्रुपच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ देण्यात आला. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सहा वर्षापासून करमाळा शहरातील व तालुक्यातील निराधार आजी- आजोबांना दोन वेळचे मोफत जेवण दिले जाते. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे. क्षितिज महिला ग्रुपच्या वतीने या वर्षीही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी क्षितिज महिला ग्रुपच्या डॉ. सुनिता जोशी व स्वाती माने यांनी श्रीराम प्रतिष्ठान व गणेश चिवटे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य भीष्माचार्य चांदणे, विलास जाधव यांनी आभार मानले. श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य रामभाऊ ढाणे, संग्रामसिंग परदेशी, संजय किरवे, महादेव गोसावी व क्षितिज महिला ग्रुपच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.