Sur Sudha Jeevan Gaurav Award to Principal Balasaheb Narare

करमाळा (सोलापूर) : यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘सुर सुधा जीवन गौरव’ पुरस्कार सूर ताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना देण्यात आला. प्राचार्य नरारे यांनी करमाळा तालुक्यात 26 वर्ष संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार आमदार संजयमामा शिंदे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यश कल्याणीचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. दत्तात्रेय देवळे, डॉ. ऍड. बाबुराव हिरडे यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य नरारे यांनी 26 वर्ष सूर ताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संगीत विशारद अलंकार झाले असून करमाळा तालुक्यात संगीता क्षेत्राचे वलय निर्माण केले आहे. याची दखल घेत श्रीफळ, ट्रॉफी आणि ५१ हजार रुपये देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी समाजसेवक श्रेणिक खाटेर, डॉ. कविता कांबळे, करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, नगरसेवक महादेव फंड, डॉ. प्रमोद कांबळे, डॉ. शेटे, डॉ. भोसले, डॉ. दीपक पाटील, डॉ. महेश वीर, डॉ. विजयकुमार जाधव, श्री. चोपडे तसेच आर्ट ऑफ लिविंग करमाळा व पतंजली योग समिती करमाळाचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *