करमाळा (सोलापूर) : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून वाहन मालकाची ९ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकणी एका मुकादमाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कांतीलाल दुलजी सोनवणे (वय ५५, रा. पांगण, ता. साक्री, जि. धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील तानाजी प्रभाकर कोकरे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कोकरे यांनी म्हटले आहे की, बारामती ऍग्रोकडे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी करार केला. होता. मुकादम सोनवणे हे ऊसतोडीसाठी १३ मजूर (१३ कोयते २६ मजूर) पुरवणार होते. मात्र कारखाना सुरु झाला तरी त्यांनी मजूर पुरवले नाहीत. त्यासाठी त्यांना ९ लाख २५ हजार रुपये घेतले होते. त्यांनी कामगार पुरवले नाहीत व पैसेही पुन्हा दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही फिर्याद दिली त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.