करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संगीता प्रभाकर पिंपळे (वय ४५) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी महिलेकडून ३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून ही कारवाई झाली आहे. महिला पोलिस कॉन्स्टेबल बुशरा इसाक राज यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.
पेट्रोलिंग सुरु असताना केत्तूर नंबर २ येथील पारेवाडी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक महिला बेकायदा दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा गुन्हा दाखल झालेली संशयित महिला बेकायदा दारू विक्री करत असताना दिसली, असे फिर्यादीत म्हटले आहे.