करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘बुधभूषण’ हा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याने जबाबदारी वाढली असून ‘वृत्तबध्द’ कविता हा प्रकार माझ्या जवळचा आहे. आपल्या जगण्यातील लय हे कवितेतून व्यक्त होत असते. कवितेचा आत्मा हा जीवनाचा आशय असतो. कवितेमधुन आत्म्याशी संवाद साधला जातो. त्यामुळे तिला हलक्यात घेऊ नका, असे आवाहन कवयत्री प्राजक्ता वेदपठक यांनी पुरस्काराला उत्तर देताना केले आहे. आपल्या कलाकृतीला पावती मिळते तेव्हा आपल्याला खरी प्रेरणा मिळत असते, असेही त्या म्हणाल्या आहेत.
करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने कवयत्री प्राजक्ता वेदपठक यांच्या ‘तू चिरंतन कविता माझी’ या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट कविता संग्रहासाठीचा राज्यस्तरीय ‘बुधभूषण पुरस्कार’ देण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहात पुरस्काराचे आज (रविवारी) वितरण झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे होते. मंचावर विद्या मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, स्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे व करमाळा तालुका साहित्य मंडळाचे अध्यक्ष कवी प्रकाश लावंड उपस्थित होते.
करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटात कवींची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येकी तीन कवींचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शालेय गटात ‘कवी अभियंता मधुकर खडके स्मृती पुरस्कार’ देऊन साक्षी ढेरे, अपूर्वी पवार व तन्वीर दवणे यांचा सन्मान झाला. महाविद्यालयीन गटात ‘गुरुवर्य परदेशी पुरस्कारा’ने दिपाली राऊत, अर्चना शिंदे व ऋतुजा सरतापे यांचा तर खुला गटमध्ये ‘प्राचार्य प्रभाकर बिडवे पुरस्कारा’ने संजय अवघडे, प्रज्ञा दिक्षीत व रेश्मा दास यांचा गौरव झाला. साहित्यक्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल सोमनाथ टकले यांचा व ग्लोबल सायन्स इन्स्ट्युटचे प्राचार्य महेश निकत यांचा यावेळी गौरव झाला.
कवयत्री वेदपाठक म्हणाल्या, ‘कविता किंवा इतर साहित्य हे माणूसपण जपण्याला मदत करत असते. पतीचे निधन झाल्यानंतर कवितेने मला जगण्याला आधार दिला.’ लावणी सादर करून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘स्वतःला कमजोर समजुनका हा सल्ला त्यांनी मुलींना दिला. दैनदिन जिवन सोडून कवितेकडे पहा’, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
विद्या विकास मंडळाचे सचिव घुमरे म्हणाले, ‘व्यहवार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आयुष्यात प्रगती होऊ शकत नाही. आपण कौशल्याच्या जोरावर सिद्धता दाखवली तरच समाजात किंमत असते. महाविद्यालयात हा कार्यक्रम होत आहे हे अभिमानास्पद आहे. सामाजिक कार्यक्रमाला आमचे कायम सहकार्य असते. मी माणसे वचली समाजाला मदत केली. माझी नजर ही आपण कमी कोठे पडलो आणि त्यात पुढे दुरुस्ती कशी करता येईल यावर असते’, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना घुमरे म्हणाले, ‘प्रत्येकाने छंद जोपासत आत्मपरीक्षण केले पाहिजे, आपली बौद्धीकता तपासली पाहिजे. महाराष्ट्र साहित्य मंडळाशी आपण संलग्न नाहीत ही खंत’, असल्याचे घुमरे यांनी सांगितले. समाज घडवताना दानशूर व्यक्ती आणि सरकारची मदत आवश्यक असते, असेही ते म्हणाले. आयुष्यात अभ्यासाशीवाय पर्याय नाही. प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
डॉ. कांबळे म्हणाल्या, ‘माझं नाव कविता पण मला कधीही कवितेची जाण नव्हती. पण एका पुस्तकाचा अभिप्राय देताना मी साहित्याशी जोडले गेले. मराठी भाषा जगण्याला आधार देते. कविता आपली प्रेयसी असते ती आई असते ती जगण्याचे साधन असते’, असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक मंडळाच्या खजिनदार डॉ. सुनिता दोशी यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने पुरस्कार देण्याचे हे दुसरे वर्ष आहे. करमाळा तालुक्यातील कवींना व साहित्यकांना हक्काचे स्थान मिळावे म्हणून मंडळाची स्थापना झाली होती. कोरोना काळात अॉनलाईन संमेलन घेतले होते. मंडळाने कवी संमेलन, हस्यजत्रा, ग्रंथदिडी, काव्यलेखन स्पर्धा घेतल्या आहेत.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व ग्राहक पंचायतचे भालचंद्र पाठक यांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्राहक दिना दिवशीच भालचंद्र पाठक यांचे निधन झाले आहे. काम करतच ते गेले त्यांनी संपूर्ण आयुष्य ग्राहकांसाठी घालवले, असे डॉ. दोशी यावेळी म्हणाल्या. मंडळाचे प्रसिध्दी प्रमुख खलील शेख, दादासाहेब पीसे, प्रा. नागेश माने, विश्वस्त किरण गायकवाड, संतोष कांबळे, श्री. वांगडे, मोरेश्वर पवार, विशाल पाटमास आदी यावेळी उपस्थित.