Lockdown Lagna will feature actress Pritam Kagane and actor Ramesh Pardeshi as brother and sister

अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ व बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कांगणे, अमोल कांगणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटातून कोरोना काळातल्या लग्नाची गोष्ट दाखवली जाणार आहे. उत्तम स्टारकास्टसह धमाल, मजेशीर आणि मनोरंजक असं कथानक या चित्रपटाची खासियत आहे.

रमेश परदेशी आणि प्रीतम कांगणे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून त्यांच्या सक्षम अभिमनयाचं दर्शन घडवलं आहे. “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटात ते पहिल्यांदा़च भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. बहिणीच्या लग्नासाठी भाऊ किती कष्ट घेतो, बहिणीला चांगला नवरा मिळवून देण्यासाठी तो किती धडपड करतो, हे लग्न जुळवताना त्यालाच एक मुलगी आवडते, त़्या दरम्यान काय धमाल होते याचं चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, सुनील अभ्यंकर, प्रवीण तरडे, क्षितिष दाते, अमोल कागणे, विराट मडके,प्राजक्ता गायकवाड,अश्विनी चावरे, चेतन चावडा, किरण कुमावत, सुशांत दिवेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *