Seminar on state of the art technologies and systems organized by Institute of Defense Scientists and Technicians and DRDO

पुणे : वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान व प्रणाली विकसित करणे आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ संस्था (Institute of Defence Scientists & Technologists) आणि डीआरडीओच्या (Research and Development Estt. (Engrs), DRDO) वतीने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रणालीवर चर्चासत्र आणि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या क्षेत्रांत काम करणाऱ्या विविध तज्ज्ञ आणि उत्पादक कंपन्या या निमित्ताने एकत्र येत आहेत. हे प्रदर्शन पाषाण येथील डीआरडीओच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात फक्त निमंत्रितांसाठीच असणार आहे. यामध्ये पाणबुडी, रणगाडे, विमान, ड्रोन क्षेत्रातील आधुनिक संरक्षण उत्पादने पाहता येणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता महासंचालक ACE (आर्ममेंट अँड कॉम्बॅट इंजिनीअरिंग सिस्टीम्स, DRDO) डॉ. शैलेंद्र व्ही गाडे यांच्या हस्ते तर Research and Development Estt. (Engrs)चे संचालक डॉ. मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील आगामी तांत्रिक ट्रेंड प्रदर्शित करण्याचा आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग आणि स्टार्टअप यांना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. देसाई बापूराव सरवदे यांनी दिली.

निमलष्करी, आपत्ती व्यवस्थापन इत्यादींतील वापरकर्त्यांद्वारे स्वायत्त प्रणालींच्या वापरावर विस्तृत चर्चा यावेळी करण्यात येणार आहे. DRDO, ISRO, BARC, CDAC, CSIR, NIO, NIOT इत्यादी राष्ट्रीय संशोधन संस्थेतील डिझाइनर्स त्यांच्या गरजा आणि महत्वाकांक्षा दाखण्यासाठी सादरीकरण तसेच या क्षेत्रात संशोधन करणार्‍या नामवंत शिक्षणतज्ञांची चर्चा करणार आहेत. लष्करी दृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने संरक्षण सामग्री बनवण्याच्या भारताच्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने ह्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *