कुक्कुट पालन प्रशिक्षणाचा शुभारंभ

Launch of Poultry Training in Solapur

सोलापूर : भविष्यातील शेतीपूरक जोड व्यवसायास चालना मिळविण्यासाठी व पशु पालकांचे आर्थिक उत्पादन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सधन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर, सोलापूर येथे 20 फेब्रुवारीपर्यंत कुक्कुट पालन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रशिक्षणार्थ्याना त्यांच्या भविष्यातील शेतीपूरक जोड व्यवसायास चालना मिळविण्यासाठी व त्यातून पशु पालकांचे आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत असून यातून शेतमजूर, महिला, सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसाय सुरु करण्याची मोठी संधी मिळणार आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. पी. माने यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले आहे. तरी पुढील प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पशु पालकांनी जास्तीत- जास्त नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एम. बोधनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *